कोरोनाच्या हाहाकारामुळे आणखी एका राज्यात लॉकडाऊन जाहीर
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिकट बनली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिकट बनली आहे. आतपर्यंत देशात 2 कोटी लोकांना कोरोना संसर्गाने घाला घातला आहे. सध्या देशात 30 लाखापेक्षा जास्त रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता बिहार सरकारनेही लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
CM नितिश कुमार यांचे आवाहन
मुख्यमंत्री नितिशी कुमार यांनी लॉकडाऊन जाहीर करताना म्हटले की, कॅबिनेटमध्ये आज राज्यात लॉकडाऊन लावण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. प्रशासनाला सविस्तर गाइ़डलाईन्स जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार बिहारमध्ये 15 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बिहारमध्ये परिस्थिती बिकट
कोरोना संसर्गामुळे बिहारमधील रुग्णांचे हाल होत आहेत. आरोग्य यंत्रणा अपूऱ्या पडू लागल्या आहेत. संसर्गीत रुग्णांचे हाल होऊ नये, त्यांना योग्य उपचार मिळावे, त्यासाठी पायाभूत सुविधा तातडीने उभ्या कराव्यात, दरम्यान लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी व्हावा म्हणुन लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाने फटकारले
राज्यातील कोरोना स्थिती चिंताजनक होत आहे. या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार काय पावले उचलत आहे. लॉकडाऊन बाबत काय विचार केला आहे. असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सरकारने आतपर्यत जे ऍक्शन प्लॅन दिले होते. ते सगळे अर्धवट असल्याचे उच्च न्यायालयाने फटकारले होते.