कोव्हिशिल्डचे 2 डोस मग तुमचं लग्न ठरू शकतं!
लग्नासाठी नखरे तर खूप असतात पण तरुणीनं ठेवलेली अट पाहून तुम्हीच ठरवा तिला काय म्हणायचं?
मुंबई: जगभरात लग्नासाठी मुलं किंवा मुली आपल्या अटी ठेवतात. त्या अटी एकमेकांना मान्य झाल्यानंतर लग्न करण्याचा विषय पुढे जातो. या लग्नासाठी विचित्र अटी ठेवणारीही काही मंडळी असतात. असाच एक स्थळ समोर आलं आहे. त्यांची अट रास्त असली तरी वाचून दोन मिनिटं हसू येतं. नेमकी ही अट तरी काय आणि अशी काय अट ठेवली आहे जाणून घेऊया.
कोरोनाचा लग्न समारंभालाही मोठा फटका बसला आहे. अनेकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून तर काहींनी लग्नच पुढे ढकलली आहेत. मात्र लग्नला वर शोधण्यासाठी एक अजब अट ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. वधू-वर पाहिजे या कॉलम अंतर्गत एक कुटुंबाने लसीचे दोन्ही डोस घेतलेला वर पाहिजे अशी अट ठेवली आहे.
लग्नासाठी कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेला नवरा पाहिजे अशी अट एका तरुणीनं ठेवली आहे. या तरुणीनं तशी जाहिरात देखील दिली आहे. शशी थरूर यांनी यासंदर्भातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तरुणीने ठेवलेली अट काय़ आहे ते तुम्ही देखील पाहू शकता.
या तरुणीने कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतले आहेत. ही तरुणी आता कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेला वर शोधत आहे. 4 जून 2021 च्या वृत्तपत्रात तरुणीने यासंदर्भात जाहिरात देखील दिली होती. लस घेतलेल्या तरुणीने कोव्हिशिल्ड लस घेतलेला नवरा हवी अशी अट ठेवली. लग्नाचं गिफ्ट एक बूस्टर शॉट असले यात कोणती शंकाच नाही असं मजेशीर कॅप्शन देऊन शशी थरूर यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.