नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतोच आहे. या दरम्यान आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ज्या लोकांना कोरोना व्हायरसची लक्षणं आहेत किंवा जे कोरोना संशयित आहेत, त्या सर्वांसाठीच या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरस संशयित किंवा ज्यांना हलकी कोरोनाची लक्षणं आहेत अशा लोकांकडे राहायला घर असेल आणि घरांत आराम करण्याची योग्य सुविधा असेल तर असे लोक होम आयसोलेशचं पालन करुन शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- जर डॉक्टरांनी एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं अतिशय कमी असल्याचं सांगितलं असेल तर तो व्यक्ती होम आयसोलेशन करु शकतो. सेल्फ आयसोलेशन किंवा होम आयसोलेशनदरम्यान, रुग्ण कुटुंबियांच्या संपर्कात येऊ नये यासाठी घरी आवश्यक सुविधा असणं गरजेचं आहे. घरातील इतर व्यक्तींसाठी वेगळं राहण्याची सुविधा असणं आवश्यक आहे.


- 24 तास घरांत रुग्णांची देखभाल करण्यासाठी एक व्यक्ती असणं गरजेचं आहे. आयसोलेशनदरम्यान देखभाल करणारा आणि रुग्णालय यांच्यात सतत संवाद असणं आवश्यक आहे.


- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, हायड्रोक्सीक्लोक्वीन औषध घेण्याबाबत पालन करावं. मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन ते वायफाय किंवा ब्लूट्यूथशी कनेक्ट असावं.



- होम आयसोलेशन व्यक्तीची नियमित माहिती रुग्णालय, जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना देणं आवश्यक आहे.


- लक्षणं विकसित झाल्यास किंवा रुग्णाची स्थिती गंभीर आढळ्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


 


- होम आयसोलेशनदरम्यान लक्षणं पूर्णपणे आढळत नसतील तर, रुग्णांवर सतत निगरानी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे त्या व्यक्तीचं परिक्षण केलं जाईल. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्ती संसर्गमुक्त झाल्याचं घोषित केलं जाईल. त्यानंतरच व्यक्ती होम आयसोलेशनमधून बाहरे येऊ शकतो.


होम आयसोलेशनसंबंधी सर्व माहिती, सूचना आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कोरोना संशयित किंवा हलकी कोरोना लक्षणं असणाऱ्या व्यक्तीला आणि या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या दोघांनाही नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.