नवी दिल्ली : देशभरामध्ये सुरु असणारा कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहता जवळपास 11 राज्यांमध्ये करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेतून अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण आयसीएमआरकडून नोंदवण्यात आलं आहे. 14 जून ते 6 जुलै या काळात केल्या गेलेल्या सेरो सर्व्हेनुसार 11 राज्यांपैकी दोन तृतीयांश नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत. (Coronavirus ICMR serosurvey two third of population surveyed in 11 states have coronavirus antibodies)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर निरिक्षणानुसार मध्य प्रदेशमधील नागरिकांमध्ये सर्वाधिक 79 टक्के अँटीबॉडीज निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, या यादीमध्ये केरळमध्ये सर्वात कमी म्हणजेच 44.4 टक्के अँटीबॉडीजचं प्रमाण नोंदवण्यात आलं आहे. आसाममध्ये हेच प्रमाण 50.3 टक्के आणि महाराष्ट्रात 58 टक्के इतकं आहे. 


आयसीएमारकडून करण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सेरो सर्व्हेच्या निरीक्षणाबाबतची माहिती बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाकडून देण्यात आली. या निरीक्षणानुसार राजस्थानमध्ये 76.2 टक्के, बिहारमध्ये 75.9 टक्के, गुजरातमध्ये 75.3 टक्के, छत्तीसगडमध्ये 74.6 टक्के, उत्तराखंडमध्ये 73.1 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 71 टक्के, आंध्र प्रदेशमध्ये 70.2 टक्के, कर्नाटकमध्ये 69.8 टक्के, तामिळनाडूमध्ये 69.2 टक्के आणि ओडिशामध्ये 68.1 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याची माहिती समोर आली. 


बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची माहिती...


 


कोरोना विषाणूचा संसर्ग देशात नेमका कुठवर पसरला होता, याच्या निरीक्षणासाठी हा सेरो सर्व्हे घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. दरम्यान, मागील काही दिवसांची आकडेवारी रुग्णांची आकडेवारी कमी असली तरीही हलगर्जीपणा नको असाच सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरामध्ये कोरोना संसर्ग बऱ्याच अंशी आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. लसीकरण मोहिमेस मिळालेली गती, आरोग्य विभागाकडून उचललेली पावलं आणि नागरिकांची सतर्कता याचेच हे परिणाम असल्याचं कळत आहे.