कोरोनाचा उद्रेक : रेल्वेने घेतला मोठा निर्णय, यासाठी आता 500 रुपये दंड
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ( Indian Railway) आज शनिवारी नवीन कोविड - 19 मार्गदर्शक तत्त्वे (new COVID-19 Guidelines) जाहीर केली आहेत.
मुंबई : देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus in India)कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ( Indian Railway) आज शनिवारी नवीन कोविड - 19 मार्गदर्शक तत्त्वे (new COVID-19 Guidelines) जाहीर केली आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाश्याला रेल्वेच्या परिसरात विना मास्क असेल आणि थुंकल्यास आता दंडही होऊ शकतो. ( Indian Railways releases new COVID-19 guidelines)
आता जर एखादा प्रवासी रेल्वेच्या आवारात थुंकना आढळून आला तर त्याचे काही खरे नाही. तसेच तोंडावर मास्क घातला नसेल तर त्याला 500 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर मास्क नसेल तर जाता येणार नाही. या संदर्भात पुढील सूचना जारी होईपर्यंत रेल्वेने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तातडीने कारवाई करु शकेल, असे अधिकृत परिपत्रकात म्हटले आहे.
रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, प्रवाश्याला भारतीय रेल्वे तसेच रेल्वे परिसरातील स्वच्छतेवर परिणाम करणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे (Penalties for activities affecting cleanliness at Railways Premises)रेल्वेच्या 2012च्या कायद्यानुसार हा दंड आकारला जाईल.
गेल्या 24 तासांत कोविड -19च्या 2.34 लाख रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 16.79 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनव्हायरसचे प्रमाण 1.45 कोटींवर पोहोचले असून 2,34,692 नवीन कोविड -19ची प्रकरणे झाली आणि गेल्या 24 तासात 1,341 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला.