राजस्थान : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. या साथीमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. दररोज कोट्यावधी नवीन कोरोना प्रकरणे समोर येत आहेत. त्याचवेळी, बरेच लोकं असे आहेत जे दिवसेंदिवस या विषाणूविरूद्ध लढा देत आहेत. अशातच एक व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आली आहे. या व्यक्तिने बर्‍याच लोकांना जीवन दान दिले आहे. त्यांमुळे त्याने प्लाझ्मा डोनेट करुन एक अनोखा विक्रम केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही व्यक्ती मूळची राजस्थानमधील कोटा शहरातील रहिवासी आहे. या व्यक्तीचे नाव पंकज गुप्ता आहे. 46 वर्षीय पंकजने आतापर्यंत नऊ वेळा प्लाझ्मा दान केला आहे. असे सांगितले जात आहे की, राजस्थानमध्ये हे पहिल्यांदा घडले आहे की, कोणी नऊ वेळा प्लाझ्मा दान केले असेल. अशी चर्चादेखील आहे की, ही देशातील नऊ वेळा प्लाझ्मा दान करणारी पहिलीच व्यक्ति आहे. अहवालानुसार पंकजने आतापर्यंत 18 कोरोना रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.


पंकज गुप्ता म्हणाले की, त्यांच्या शरीरात सतत ऍन्टीबॅाडीज तयार होत असतात. त्यामुळे जोपर्यंत ऍन्टीबॉडीज बनत राहातील, तोपर्यंत पंकज प्लाझ्मा डोनेट करणार. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्लाझ्मा दान करण्यासाठी तो लससुद्धा घेत नाही. त्यामुळे लोकं पंकजचे खूप कौतुक करत आहेत.


टीम जीवनदाताचे संयोजक भुवनेश गुप्ता यांनी सांगितले की, कोरोना काळात शेकडो डोनर्स येऊन गेले आणि त्यांनी आपले कर्तव्य बजावले. परंतु पंकज गुप्ताची गोष्ट वेगळीच आहे. तो सतत प्लाझ्मा डोनेट करत असतो. याशिवाय मनीष सरोंजा या व्यक्तिने ही असेच एक उदाहरण मांडले आहे. त्यांनी आतापर्यंत चार वेळा प्लाझ्मा दान केला आहे. मनिष म्हणतो की त्याच्या कुटुंबातील एकूण आठ जण कोरोना पॉझिटिव्ह होते. म्हणूनच, तो लोकांच्या वेदना समजून शकतो आणि त्यामुळे तो प्लाझ्मा दान करत आहे.