Lockdown 5: देशातील `या` १३ शहरांमध्येच लॉकडाऊन कायम राहणार?
१ जूनपासून देशातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल
नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून लवकरच लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सरकारने नेमलेल्या दोन समित्यांनी यापूर्वीच ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नये, अशी शिफारस सरकारला आहे. त्यामुळे केंद्राकडून देशातील १३ शहरे सोडून इतर ठिकाणचे निर्बंध उठवण्यात येणार असल्याचे कळते. 'इकॉनॉमिक टाईम्स'च्या माहितीनुसार, १ जूनपासून देशातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल. परिस्थिती पाहून हॉटेल, मॉल्स आणि रेस्टॉरन्ट देखील १ जूनपासून उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तर हॉटस्पॉट असलेल्या शहरांतील निर्बंध आत्तापेक्षाही कठोर करण्यात येतील.
३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नका; सरकारी पॅनेल्सची केंद्राला शिफारस
चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी रविवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्राकडून लवकरच नव्या सूचना जारी केल्या जाऊ शकतात. सुरुवातीला केंद्र सरकार आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, हे निर्बंध मोजक्या शहरांपुरते सिमीत असतील, असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. रविवारी होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही बाबी स्पष्ट करू शकतात. लॉकडाऊन कायम राहणाऱ्या शहरांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, इंदोर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवलूरम यांचा समावेश आहे.
लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवा, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मागणी
हॉटेल्स आणि मॉल उघडण्याचाही विचार
लॉकडाऊन उठवण्यात येणाऱ्या शहारांमध्ये १ जूनपासून हॉटेल्स, मॉल आणि रेस्टॉरंटसही उघडण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे देशातील व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, मुंबईसारख्या हॉटस्पॉट असलेल्या शहरांत तुर्तास हॉटेल्सचा वापर पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राहण्यासाठी केला जात आहे.