मुंबई : जवळपास संपूर्ण देश कोरोनाव्हायरसच्या जाळ्यात आला आहे. देशातील कोरोना बाधितांच्या बळींची संख्या आता वाढून ४९२ झाली आहे. यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कोविड -१९ पासून आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविड१९ मध्ये जगभरात ३ लाख ८० हजारांहून अधिक रुग्ण आहेत आणि  १६,४९७ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात पहिल्यांचा राज्यस्थानात शटडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात शटडाऊन करण्यात आले. दिल्लीतही शटडाऊन करण्यात आले. आता उत्तर प्रेदशात लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे  उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी उत्तर प्रदेशात म्हणजेच २५मार्चपासून लॉकडाउन होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी कोरोना आपत्ती म्हणून घोषीत करण्यास मान्यता दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा वाढते संकट रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. तरीही कोरोनाचे संकट थांबण्याचे नाव घेत नाही. उत्तर प्रदेशात लखनऊमध्ये  बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिने पार्टी आयोजित केली होती. कनिकाला कोरोना बाधित होती. तिने हीबाब लपविली होती. ती लंडनहून परत आल्यानंतर तिला याची लागण झाली होती. तरीही तिने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत १०० सेलिब्रिटीज सहभागी झाले होते. यात खासदार दुष्यंत, भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंदराराजे  शिंदेही सहभागी झाले होते. यात खासदार दुष्यंत यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ते लोकसभेत अधिवेशनालाही गेले होते. त्यामुळे याची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर संपूर्ण संसद केमिकलने धुवून काढण्यात आली होती. तसेच अनेक खासदारांनी स्वत: कोरंटाईन करुन घेतले.


दरम्यान, कनिका कपूरचा दुसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी गायिका कनिका कपूरची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा करण्यात आलेली चाचणी पॉझिटिव्ह असताना देखील तिच्या नातेवाईकांकडून पुन्हा कोरोना चाचणी करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्यांदा कनिकाची कोरोना चाचणी करण्यात आणि आणि तिची ही चाचणी देखील पॉझिटीव्ह सिद्ध झाली आहे.  


डीएनएने दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार कनिकासोबतच तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. लंडनवरून भारतात परतल्यानंतर तिने ३५ लोकांसोबत अधिक वेळ घालवा होता. त्यांपैकी ११ जणांचे रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत, तर २४ जणांचे रिपोर्ट यायचे आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तसेच कनिकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.