नवी दिल्ली: कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला. परीक्षा स्थगित करण्यात आल्या. मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद करण्यात आल्या होत्या जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ शाळा बंद होत्या. आता कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरू होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळा सुरू झाल्यानं पालकांना सर्वात जास्त आनंद झाला आहे. दिल्लीमध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर पालक-विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावं यासाठी त्यांचं शाळेच्या आवारात बॅण्ड बाजा वाजवून स्वागत करण्यात आलं. यावेळी लहान मुलांना एक वेगळाच आनंद झाला. काही मुलांनी हात उंचावून या बॅण्डवर ठेका धरला. 


शाळेबाहेर बॅण्ड आणि बाजामुळे वाढलेल्या उत्साहानंतर विद्यार्थी क्लासरुममध्ये धावत जाऊन बसले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोक खूप वेगवेगळ्या कमेंट्स देखील करत आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने मुलं 24 तास घरात राहूनही कंटाळले होते. तर पालकांसमोरही मुलांना सतत काहीतरी नवीन काम, खेळ देण्याचं आव्हान होतं. 


20 महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. विद्यार्थी देखील या बॅण्ड वर ठेका धरला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे.