नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसची २९ रुग्णांना लागण झाली आहे. २९ रुग्ण आढळल्यामुळे दिल्लीत उपाययोजनांसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारने वेगवेगळ्या बैठका घेतल्या. कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. तर चीनमध्ये कोरोना व्हायरसरमुळे आतापर्यंत ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल दिवसभरात चीनमध्ये कोरोनानं ३१ बळी घेतलेत. तर १३९ नव्या रुग्णांची भर पडलीये. त्यामुळे एकट्या चीनमधील कोरोना बाधितांची संख्या ८० हजार ४०९वर पोहोचलीये.. इटलीतही कोरोनानं थैमान घातलं असून इटतील आतापर्यंत १०७ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार जणांना कोरोनाची बाधा  झालीये. यूएसमध्ये ही कोरोनानं ११जणांचा बळी घेतलाय. कॅलिफोर्नियात कोरोनाचे ५३ रुग्ण आढळून आल्यानं सरकारने आणीबाणी घोषीत केली आहे.


हरियाणात संशयित रुग्ण आढळला


हरियाणातल्या सिरसा शहरात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. या संशयित रुग्णाला सिरसा शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. १० दिवसांपूर्वीच हा रुग्ण इटली आणि रोममधून भारतात परतलाय. त्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. 


धुळवड न खेळण्याचे आवाहन 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी उत्सव खेळू नका, असे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळवड न खेळण्याचे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केले आहे. कोरोनाला घाबरू नका मात्र व्यक्तिगत पातळीवर खबरदारी घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय. मुंबई, पुणे, नागपूर इथे चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून मास्कचाही पुरेसा साठा केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. 


0



अयोध्येत होम-हवन 


अयोध्येत कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी होम-हवन करण्यात आलं. महंत परमहंस दास, त्यांचे शिष्य आणि भाविकांनी हा होम केलाय. कोरोनाचा धोका टळावा यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.  


चीन कंपन्यांचा नकार


कोईम्बतूरमध्ये इंटरनॅशनल सोर्सिंग शोचं आयोजन करण्यात आले आहे. ६० चीनी कंपन्यांनी फेस्टीव्हलच्या तिसऱ्या दिवशीच्या सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.