मुंबई : ओमायक्रॉनमुळं आधीच अख्खं जग टेन्शनमध्ये असताना, आता त्यापेक्षाही आणखी एक खतरनाक कोरोना व्हेरियंट आला आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन या व्हेरियंटच्या संयोगातून या नवा घातक व्हेरियंट जन्माला आला आहे. नेमका कसा आहे हा नवा कोरोना व्हेरियंट आणि नेमकी काय आहेत लक्षणं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटनं सध्या अमेरिका आणि इंग्लंडमध्ये धुमाकूळ घातला आहे. जगातल्या विविध देशांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. याआधी कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं जगभरात खळबळ उडवून दिली होती. 


आता त्यापेक्षाही अधिक खतरनाक असा डेलमायक्रॉन व्हेरियंट जगातल्या विविध देशांमध्ये हातपाय पसरतो आहे. डेलमायक्रॉनमुळं जगात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. तर भारतात तिस-या लाटेचं संकट येऊ घातलंय. डेलमायक्रॉनमुळं आता सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. 


डेलमायक्रॉन घातक का? 
डेलमायक्रॉन हा डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचं मिश्रण आहे. दोन्ही व्हेरियंट्समधून खतरनाक डेलमायक्रॉन जन्माला आला आहे. 
डेलमायक्रॉन जगभरात पसरल्यास लाखो लोकांचे मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉनपेक्षा अधिक वेगानं डेलमायक्रॉन पसरत आहे. भारतात अजून तरी डेलमायक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही. 


कोरोनाच्या दुस-या लाटेत डेल्टा व्हेरियंटमुळं भारतात अनेकांचे जीव गेले.  सध्या 17 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. आता या दोन्ही पेक्षा कितीतरी पटीनं खतरनाक असलेला डेलमायक्रॉन भारतात पसरला, तर काय हाहाकार उडेल, याची कल्पनाच न केलेली बरी.