नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. कोरोनावर अद्याप कोणतंही औषध, लस उपलब्ध नाही परंतु भारतासह संपूर्ण देशभरात कोरोनावरील लसीबाबत संशोधन सुरु आहे. यादरम्यान आरोग्य मंत्रालयाकडून व्हायरसवरील लससंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री हर्षवर्धनही हजर होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. हर्षवर्धन यांनी, गेल्या 14 दिवसांमध्ये आपला डबलिंग रेट 8.7 दिवस आहे. मात्र गेल्या 2 दिवसांपासून कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट 10.9 दिवस इतका आहे.


गेल्या 7 दिवसांपासून 80 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. तर गेल्या 14 दिवसांपासून 47 जिल्ह्यांपासून कोरोनाचा नवीन रुग्ण सापडला नसल्याचं ते म्हणाले.


गेल्या 21 दिवसांपासून 39 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कोणताही नवा समोर आलेला नाही.


तर 28 दिवसांपासून 17 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नव्या केसेस आढळल्या नाहीत.




गेल्या 24 तासांत देशात 1543 नवे रुग्ण आढळले. तर एकाच दिवसांत सर्वाधिक 62 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे 29 हजार 435 रुग्ण आढळले आहेत. तर 934 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


देशात 6 हजार 869 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.


 


दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फर्न्सद्वारे चर्चा केली. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत घोषित करण्यात आला आहे. मात्र अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढण्याबाबत आपलं मत मांडलं आहे.