मुंबई : कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे अनेक निर्बंध लादण्यात येत आहेत. देशभरात 'लॉकडाऊन' करण्यात आलं आहे. पेट्रोलपंपावर काही नियम लागू केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी घटत असल्याच समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कच्चा तेलाचे दर कमी झाले आहे. मात्र लोकं लॉकडाऊन झाल्यामुळे मागणी देखील कमी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागणी कमी होऊनही ऑइल मार्केटिंग कंपन्या स्वस्त झालेलं कच्च तेल ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. आज दहावा दिवस आहे जेव्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीच बदल झालेले नाहीत. आंतरराष्ट्रीय कच्चा तेलात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. बेंचमार्क क्रूडमध्ये बुधवारी हलकी वाढ पाहायला मिळाली. तिथे २७.५१ डॉलर प्रति डॉलरचा स्तर निश्चित झाला आहे. हा स्तर टॉप लेव्हलहून अधिक आहे. 



तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कच्च तेल यापेक्षा कमी झालं तरी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीच बदल होणार नाही. सरकारला कच्चा तेलाच्या घटामुळे झालेल्या फायद्याचा उपयोग हा कोरोना व्हायरसच्या महामारीशी लढण्यासाठी होणार आहे. 


शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 


दिल्ली 69.59 रुपये 62.29 रुपये

मुंबई 75.30 रुपये 65.21 रुपये

कोलकाता 72.29 रुपये 64.62 रुपये

चेन्नई 72.28 रुपये 65.71 रुपये

नोएडा 72.03 रुपये 62.96 रुपये