कोरोनाबाधितांसाठी आता `पॉकेट व्हेंटिलेटर`, पाहा नेमकं काय आहे हे...
कोरोनाच्या (Coronavirus ) दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवला. वेळेत व्हेंटिलेटर (ventilator) मिळाले नाही म्हणून...
कोलकाता : कोरोनाच्या (Coronavirus ) दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवला. वेळेत व्हेंटिलेटर (ventilator) मिळाले नाही म्हणून अनेकांचा बळीही गेला. ही समस्या पुन्हा उदभवू नये म्हणून बंगालच्या एका शास्त्रज्ञानं पॉकेट व्हेंटिलेटरचा शोध लावलाय. नेमकं काय आहे हे पॉकेट व्हेंटिलेटर? ( Pocket ventilator for corona patients)
कोलकाताच्या एका संशोधकाने व्हेंटिलेटरच्या समस्येवर एक पर्याय शोधला आहे. त्यांनी पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी असे या संशोधकांचे नाव आहे. ते सतत वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावत असतात. आता त्यांनी बॅटरीवर चालणारा एक पॉकेट व्हेंटिलेटर तयार केला आहे. यामुळे रुग्णाला तात्काळ उपचार मिळू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. हे व्हेंटिलेटर वापरण्यास अतिशय सोपे आणि स्वस्त आहे. एखाद्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्या रुग्णासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे असे त्याचे म्हणणे आहे.
फक्त पाव किलो वजनाचं हे पॉकेट व्हेंटिलेटर तयार केलंय कोलकात्यातले इंजिनियर डॉ. रामेंद्र लाल मुखर्जींनी... महत्त्वाचं म्हणजे हे व्हेंटिलेटर बॅटरीवर चालतं आणि खिशातही मावतं. वापरायला अतिशय सोपं आहे. देशात ऑक्सिजनची गरज असताना हे पॉकीट व्हेंटिलेटर फार उपयुक्त ठरू शकतं. कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉ. मुखर्जींना ही कल्पना सुचली. त्यांनी कोरोनामुक्त झाल्यावर अवघ्या 20 दिवसांत हे व्हेटिलेटर बनवलं. डॉ. मुखर्जींच्या दाव्यानुसार,
काय आहे याचे वैशिष्ट्य
250 ग्रॅम वजनाचं व्हेंटिलेटर बॅटरीवर चालते. मोबाईल चार्जरनंही व्हेंटिलेटर चार्ज करता येणार आहे. व्हेंटिलेटरला एक कंट्रोल नॉब आहे. त्याने ऑक्सिजन लेव्हल नियंत्रित करता येईल. कोरोना काळात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज वाढलेली असताना हा पॉकेट व्हेंटिलेटर कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरेल अशी आशा आहे.