हैदराबाद: कोरोना व्हायरसला गांभीर्याने न घेता लोकांनी लॉकडाऊनचे उल्लंघन सुरुच ठेवले तर लष्कराला पाचारण करून रस्त्यावर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे (shoot-at-sight) आदेश द्यावे लागतील, असा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिला. ते बुधवारी हैदराबाद येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार त्यांनी लोकांना lockdown चे गांभीर्य नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. लोकांनी ऐकले नाही तर तेलंगणात लष्कराला पाचारण करून कर्फ्यु लागू करावा लागेल. तसेच रस्त्यावर येणाऱ्या लोकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील. कृपया सरकारवर ही वेळ आणू नका, असे चंद्रशेखर राव यांनी नागरिकांना बजावले. 


coronavirus: जान है, तो जहान है.... मोदींचा नागरिकांना सल्ला


अमेरिकेनेही संपूर्ण कारभार लष्कराकडे सोपवला आहे. कोरोना विषाणू हा अत्यंत घातक आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी आपल्याला तातडीने काही पावले उचलावी लागतील. आम्हाला लोकांचे रक्षण करायचे आहे. त्यामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांशी आम्हाला नरमाईने वागता येणार नाही, असे चंद्रशेखर राव यांनी म्हटले. 


कोरोनात सरकारकडून लॉकडाऊनची अत्यंत कठोरतेने अंमलबजावणी करण्यात येत आहे. रात्रीच्यावेळी संपूर्ण राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे गेल्या २४ तासांमध्ये तेलंगणात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. 


कोरोनाचा वेग किती भयानक? आकडेवारी ऐकून तुमचा थरकाप उडेल


महाराष्ट्रातही नागरिक अत्यंत बेफिकिरीने वागताना दिसत आहेत. लॉकडाऊन जाहीर होऊनही अनेक लोक रस्त्यांवर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण आढळून आले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२२ वर पोहोचली आहे.