नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 29 हजारांवर पोहचला आहे. देशात एकूण 29 हजार 435 रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 62 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 24 तासांत 1543 नवे रुग्ण वाढले आहेत. सध्या देशात 21 हजार 632 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट वाढून तो 23.3 टक्क्यांवर पोहचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. 


गेल्या 24 तासांत 684 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.



कोरोनाची हलकी लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी सरकारने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. अशा रुग्णांसाठी आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करणं आणि ते इंटरनेटशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. 


coronavirus : होम आयसोलेशनबाबत आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना


आरोग्य मंत्रालयाने प्लाज्मा थेरेपीाबाबत बोलताना, ही थेरेपी कोरोनावरील प्रमुख किंवा कायमचा इलाज नाही. परंतु हा इलाज एक ट्रायल म्हणून प्रयोग केला जात आहे. या प्लाज्मा थेरेपी उपचारामुळे रुग्णांवर सकारात्मक परिणाम होत असून रुग्ण बरे होत असल्याचं चित्र आहे.