बंगळुरु : कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला तांडव माजवलेआहे. स्पेन, इटली आणि अमेरिकेत ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. स्पेनमध्ये एका दिवसात कोरोनाने ७०० लोक मरण पावले आहेत. भारतातही परिस्थिती वाढत आहे. या भयानक आजाराने देशभरातील लोकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे ६४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात आज दोन कोरोनाचे बळी गेले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकात आणखी एका कोरोना बळी गेला आहे. ७० वर्षीय वृद्ध महिला चिकबल्लापूरची रहिवासी होती. ती १४  मार्च रोजी मक्काहून परत आली. तसेच कर्नाटकमध्ये कोरोनामुळे त्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५५ कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत.



दिल्लीच्या मौजपूरमध्ये डॉक्टर, त्यांची पत्नी आणि मुलगी कोरोना यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ८०० जणांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे चौथ्या मृत्यूची नोंद झाली आहे.  २४ मार्च रोजी नवी मुंबईतील वाशी येथे या महिलेचा मृत्यू झाला. तिला कोरोना झाल्याचा आज अहवाल आला आहे, ज्यामध्ये कोरोनाला मृत्यूचे कारण सांगितले गेले आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२२ वरून १२८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.