CORONA VACCINATION - देशात कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम, आज तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतली लस
लसीकरणाला देशवासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, एकाच दिवसात लसीकरणाचा विक्रम
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. देशात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज एका दिवसात तब्बल 84 लाख 07 हजार 420 लोकांनी कोरोनाची लस घेतली असून आतापर्यंतचा लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा आहे. 16 जानेवारीपासून देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत देशात 28 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन देशवासीयांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी 'वेल डन इंडिया' असं म्हटलं आहे. कोरोनाच्या लढाईत लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. ज्यांनी लस घेतली त्या सर्वांचे अभिनंदन, तसेच सर्वच फ्रंटलाईन वर्कर्संचेही कौतुक, असे मोदींनी ट्विट करुन म्हटले आहे.