Goa News : विविध प्रकारच्या घोटाळ्यांच्या आरोपांमुळे गोवा सरकार विरोधकांच्या निशाम्यावर आहे. आता नोकरी भरतीत भष्ट्राचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.  गोवा सरकार एका महिलेच्या माध्यमातून पैशांची वसूली करत असल्याचा आरोप केलात आहे. काँग्रेसच्या आरोपांमुळे गोव्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी नोकर भरतीत भष्ट्राचार होत असल्याचा आरोप केला आहे.  सॅनक्वेलिम येथील एका महिलेवर त्यांनी निशाणा साधला आहे. या महिलेच्या माध्यमातून नोकरीच्या पोस्टिंगसाठी वारंवार लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भष्ट्राचाराविरोधात  खासदार फर्नांडिस यांनी अंजुना येथे कँडल मार्च काढला होता. या कँडल मार्चमध्ये अनेक लोक सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सरकारच्या कामकाजाच्या पद्धतीवर अनेक गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


गोव्यात नोकरी भरती तसेच पोस्टींगसाठू पैसे घेतले जातात. या साखळीत एका महिलेच्या माध्यमातून पैशांची देवाण घेवाण होते. तसेच या महिलेच्यामार्फत पैसे घेतले जातात. या महिलेबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. या महिलेविरोधात अनेक पुरावे दखील देण्यात आले आहेत.  मात्र, अद्याप या महिलेवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. नोकर भरतीच्या नावावर या महिलेने अनेकांची फसवणूक देखील केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   मुख्यमंत्र्यांकडून कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात महिलेचा शोध घेऊन तिची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी खासदार फर्नांडिस यांनी केली आहे. यापूर्वी देखील खासदार फर्नांडिस यांनी अनेक गैरप्रकार उघडकीस आणले होते.