Couple Dance Viral Video: माणसाला सुखी राहण्यासाठी जास्त काही करावं लागत नाही, फक्त अपेक्षा जास्त नसाव्यात, असं म्हणलं जातं. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कपल दिसत आहे. एकीकडे लग्नाची तयारी सुरू असताना समोरच्या घरात एक वेगळा प्रकार दिसून आलाय. (Couple Dance Viral Video Man Women Hugging and Dance Video Google Trends Couple Dance in home Caught on mobile see what happened next)


काय आहे व्हिडिओमध्ये ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोरच्या एक कपल घरात डान्स (Couple Dance) करताना दिसत आहे. खरं तर, लग्नाची पार्टी सुरू होती आणि डीजेच्या (DJ) तालावर नाचण्यापासून हे जोडपं स्वतःला रोखू शकलं नाही. लग्नाच्या घरातील एका व्यक्तीने जोडप्याचा हा डान्स आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर देखील त्याने शेअर केला आहे.


एन्जॉय करण्याची एकाकी संकल्पना आजकाल जास्त रुजू लागली आहे. कोणालाही त्रास न देता सायलेंट एन्जॉय करणं आजकाल जास्त पसंत करतात. अशातच कपलने डान्स करत सुखाचा अनुभव घेतला. या व्हिडिओवर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत.


आणखी वाचा - मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, धमकी दिली; त्यानंतर जे काही झालं...


काही नेटकऱ्यांनी गोपनीयता भंग केल्याची टीका केली आहे. तर काहींनी कपलचं तोंडभरून कौतूक केलंय. पार्टनर शोभणारा असला की बाकी काही हवं नसतं, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. हा व्हिडिओ sivamarora7 नावाच्या युजरने पोस्ट केला आहे. व्हिडिओला 16 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 2 लाख 70 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.


पाहा VIDEO -



दरम्यान, लग्नाला कोणी बोलावले नसले तरी त्याचा आनंद लुटता येतो, असं एकाने कमेंट करत म्हटलंय. त्यामुळे आयुष्यात सुखी राहण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसते, असं मत काहींनी नोंदवलंय.