घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने प्रेमी जोडप्याने कापला एकमेकांचा गळा
एक प्रेमी जोडप्याने एकमेकांचा धारदार शस्त्राने गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नवी दिल्ली : एक प्रेमी जोडप्याने एकमेकांचा धारदार शस्त्राने गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघेही एकमेकांबरोबर राहण्यासाठी आग्रही होते. पण कुटुंबाने लग्नास नकार दिल्याने या दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
फरीदाबादच्या गुलाब गार्डन मधील ही घटना आहे. जेथे एका प्रियकराला गंभीर स्थितीत बीके हॉस्पिटलमध्ये आणले गेले. पण डॉक्टरांनी दोघांना उपचारासाठी दिल्लीला पाठवले आहे.
दोघांनीही एकमेकांचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही अशा स्थितीत पाहून पार्कमधील लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना याची माहिती दिली. तरुणीने म्हटलं की ते दोघेही एकमेकांवर प्रेम करतात आणि कुटुंब यासाठी तयार नव्हतं.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी एनआयटी फरिदाबादमध्ये संजय वसाहतीमध्ये राहते तर मुलगा पर्वत कॉलनीमध्ये राहते. पोलिसांच्या मते हे दोघे ही एकमेकांवर प्रेम करतात म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.