मुंबई : अभिनेत्री प्रीती झिंटा विनयभंग प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी नेस वाडिया यांनी उच्च न्यायालयात धाव धेतली आहे. २०१४ सालचा विनयभंगाचा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका नेस वाडीयाने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या याचिकेवर न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे  यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. जर नेस माफी मागण्यास तयार असेल तर खटला मागे घेण्यास तयार असल्याचे यावेळी प्रितीच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, नेसच्यावतीने जारेदार आक्षेप घेत केवळ मीडियाचे लक्ष वेधण्यासाठीच प्रितीने हा आरोप केल्याचा दावा केला. 


दोघांच्या युक्तीवादानंतर खंडपीठाने यावर सामोपचाराने तोडगा काढा, असा सल्ला देत या दोघांना ९ ऑक्टोबरला न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश दिले.


३० मे २०१४ रोजी पंजाब किंग्स एलेव्हन आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल सामना पार पडला. सामन्या दरम्यान प्रीती झिंटाला वाडीयाने तिकीट वाटपावरुन आपल्या कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने सगळ्यांसमोर प्रीतीशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप प्रीतीने केला होता. या प्रकरणी विनयभंग आणि शीवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.