नवी दिल्ली : उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात मंगळवारी महत्त्वाची सुनावणी पार पडली. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयानं आमदार कुलदीप सिंह सेंगरसहीत इतर आरोपींना 'आर्म्स एक्ट'च्या खोट्या प्रकरणात फसवल्याप्रकरणी आरोप निश्चित केलेत. पीडितेच्या पित्याला खोट्या आरोपांखाली अटक आणि पोलीस कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यू संदर्भात कोर्टानं हे आरोप निश्चित केलेत. यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी कोर्टानं पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या आठवड्यात कुलदीप सेंगर विरुद्ध बलात्कार, पॉक्सो, अपहरणच्या वेगवेगळ्या कलमांखाली आरोप निश्चित केले होते. त्यानंतर कोर्टानं सेंगरची रवानगी तिहार तुरुंगात केलीय. सर्वोच्च न्यायालयानं पाच प्रकरणातील रस्ते अपघात सोडून बाकीची प्रकरणं तीस हजारी कोर्टाकडे सोपवलेत. या प्रकरणी न्यायाधीश धर्मेश शर्मा यांच्या कोर्टाला ४५ दिवसांत ट्रायल पूर्ण करायची आहे. यामुळे, कुलदीप सिंह सेंगरच्या अडचणींत वाढ होत असल्याचं स्पष्ट होतंय. 


सीबीआयनं सादर केले पुरावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीआयनं न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांना अवैध हत्यार बाळगल्याचा खोटा आरोप ठेवून पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांशी हातमिळवणी करत आरोपींनी हा डाव साधला होता. यासंदर्भातील पोलीस आणि आरोपींदरम्यान झालेलं मोबाईल फोनवर झालेल्या संभाषणाचा डाटाही सीबीआयनं न्यायालयासमोर माडंलाय. 


मारहाणीमुळे मृत्यू 


पीडितेच्या वडिलांना आरोपींनी सामूहिकरित्या पीडितेच्या वडिलांना जबर मारहाण केली होती. त्यामुळेच त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. याअगोदर त्यांना उन्नावच्या सीएमओनं (चीफ मेडिकल ऑफिसर) न्यायालयीन कोठडीत पाठवण्यासाठी फीट असल्याचा निर्वाळाही दिला होता. परंतु, तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे यात सीएमओ तसंच आरोपींनी रचलेला कट स्पष्टपणे दिसू शकतो, असंही पीडितेचे वकील धर्मेंद्र कुमार मिश्र यांनी न्यायालयात म्हटलं.


आरोपींमध्ये पोलिसांचाही समावेश


पोस्टमार्टेम दरम्यान पीडितेच्या वडिलांच्या शरीरावर १४ गंभीर जखमेच्या खुणा आढळल्या होत्या. या प्रकरणात कुलदीप सिंह सेंगर याच्याशिवाय त्याचा भाऊ अतुल सिंह सेंगर, माखी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अशोक सिंह भदौरिया, सब इन्स्पेक्टर कामता प्रसाद सिंह, कॉन्स्टेबल आमिर खान आणि इतर चार जणांना आरोपी बनवण्यात आलंय. या सर्व आरोपींवर आर्म्स एक्टच्या खोट्या आरोपांखाली फसवण्याच्या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलंय. त्यांच्यावर सीबीआयच्या चार्जशीटनुसार कारवाई होईल.