रामपूर : गेल्या दोन महिन्यांपासून सपाचे खासदार आजम खान यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपा उमेदवार आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते. यानंतर जयाप्रदा यांनी न्यायालयात धाव घेतली होती. हे वादग्रस्त विधान आजम खान यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण गुरुवारी न्यायालयाने त्यांचे अंतरिम जामिन फेटाळून लावला. तसेच आजम खान यांच्या घराबाहेर समन्स देखील लावण्यात आले आहे. सीजीएम न्यायालयातून हे समन जारी करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजम खान हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. यामुळे ते नेहमीच अडचणीत येत असतात. लोकसभा निवडणुकी दरम्यानही त्यांनी असेच वक्तव्य करत खळबळ उडवली. यावर निवडणूक आयोगाने दखल घेत त्यांच्यावर ७२ तास प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली होती. 



हे प्रकरण न्यायालयात असून आता पोलिसांनी हे समन्स खासदार आजम खान यांच्या घरावर चिटकवले आहे. त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.