मुंबई : आजवर 22 कोटी जनतेचं देशभरात लसीकरण झालंय. पण लस कुठली घ्यावी, याबद्दल अजूनही तुमचा निर्णय झाला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आहे.. कुठल्या लसीमुळे जास्त आणि लवकर अँटिबॉडीज तयार होतात, याबद्दल नुकतंच एक संशोधन झालंय. पाहुया त्याचं उत्तर काय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगात सगळ्यात लसींसंदर्भात अभ्यास सुरू आहे. भारतातली कुठली लस जास्त प्रभावी यासंदर्भात तज्ज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत.


- कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्ड लस जास्त अँटिबॉडीज तयार करते. त्यासाठी ५१५ डॉक्टर्स आणि नर्सवर प्रयोग करण्यात आले. त्यांच्यापैकी ४५६ जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली. तर ९६ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. कोविशिल्ड देण्यात आलेल्यांमध्ये जास्त आणि वेगवान अँटिबॉडीज सापडल्या आहेत.


याआधी ICMR चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनीही अशाच प्रकारचा दावा केला होता. कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसमुळे पुरशा अँटिबॉडीज तयार होत नाहीत. तर दुसरा डोस घेतल्यावर अँटिबॉडीज तयार होतात. मात्र कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यावरच अँटिबॉडीज तयार होतात, असं भार्गव यांनी स्पष्ट केलं होतं. आता या नव्या सर्वेमुळे त्याला पुष्टी मिळाली आहे. 


दरम्यान आज पंतप्रधान मोदी यांनी १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी मोफत लसीची घोषणा केली आहे. लसीकरणाचं काम आता पुन्हा केंद्र सरकारचं पाहणार आहे. राज्य सरकारला आता लसीसाठी खर्च करण्याची गरज नाहीये. केंद्र सरकारचं राज्यांना लस पुरवणार आहे.