मुंबई : देशात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग  सतत वाढत आहे आणि लसीकरण हे साथीच्या रोगाविरुद्ध सर्वात मोठे शस्त्र मानले जाते. कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) लस सध्या देशभरातील 18 वर्षांवरील लोकांना दिली जात आहे, परंतु यापैकी कोणती लस अधिक प्रभावी आहे, याबद्दल सतत चर्चा सुरु आहे. आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) डीजी. डॉ. बलराम भार्गव यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. 


Covaxin पेक्षा Covishieldमधून जास्त अँटीबॉडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) प्रमुख डॉ. बलराम भार्गव (Dr Balram Bhargava)यांनी कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोविशिल्ड  (Covishield) या लसच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लसीकरणानंतर अँटीबॉडीजविषयी  (Antibody) धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले, "कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसपेक्षा जास्त अँटीबॉडी तयार होतात." (covaxin vs covishield First covaxin dose not as effective as covishield says icmr head balram bhargava)


कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर अँटीबॉडी 


'टाइम्स ऑफ इंडिया'च्या अहवालानुसार, आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव म्हणाले, 'कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर पुरेशा अँटीबॉडीज तयार होत नाहीत, तर दुसरा डोस घेतल्यानंतर पुरेशा अँटीबॉडी तयार होत आहेत. हे नव्या अभ्यासात उघड झाले आहे. त्याचवेळी, कोविशिल्डचा प्रथम डोस घेतल्यानंतरच त्यातून चांगल्या प्रकारे अँटीबॉडी (Antibody)तयार होते.


कोविशिल्डच्या 2 डोस दरम्यानचे अंतर वाढविले


पहिल्या डोसमध्ये चांगल्या प्रकारे अँटीबॉडी विकसित झाल्यामुळे कोविशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील अंतर 12-18 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्याचवेळी, कोव्हॅक्सिनसाठी (Covaxin)लागू केलेले चार आठवड्यांचे अंतर बदलण्यात आलेले नाही. कोविशिल्डसाठी (Covishield) तीन महिन्यांचे अंतर अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल बोलताना डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, पहिल्या डोसनंतर प्रतिकारशक्ती खूपच चांगली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तीन महिन्यांच्या अंतराचा परिणाम चांगला दिसून येईल.