रेल्वेचा मोठा निर्णय, नव्या नियमानुसार मास्क न घातल्यास इतका होणार दंड
Railways to fine Rs 500 for not wearing face masks : रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) कोविड-19बाबतची नियमावली (Covid-19 rules) पुढील सहा महिन्यांसाठी वाढवली आहे.
मुंबई : Railways to fine Rs 500 for not wearing face masks : रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) कोविड-19बाबतची नियमावली (Covid-19 rules) पुढील सहा महिन्यांसाठी वाढवली आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आणि कोविड नियमांचे पालन करण्यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता नव्या नियमानुसार मास्क (mask) न घातल्यास दंड आकारण्यात येणार आहे. मास्क नसेल तर 500 रुपये दंडाच्या स्वरुपात भरावे लागणार आहेत. (COVID-19: Railways to fine Rs 500 for not wearing face masks in rail premises, trains)
मुंबईसह या स्थानकांवर मिळणार प्लॅटफॉर्म तिकिटे, 50 रुपये तिकीट
सध्या सणासुधीचे दिवस आहे. दसरा आणि दिवाळी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेने कोविडची नियमावली सुरुच ठेवली आहे. त्यानुसार पुढील निर्देश येईपर्यंत हीच कोरोना नियमावली राहील. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे प्लॅटफॉर्मचे तिकीट वाढवण्याबरोबरच रेल्वे मंत्रालयाने अन्य नियमसुद्धा आणखी कडक केले आहेत. मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांविरोधात कडक पाऊल उचलण्यात येणार आहे. नव्या आदेशानुसार रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये मास्क न वापरल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. सण लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्बाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हा नियम लागू करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या मुहूर्तांमुळे मुंबई विभागातील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट (Railway Platform ticket ) पुन्हा सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. आजपासून पुढील आदेशापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.