मुंबई : Night Curfew Update: देशात पुन्हा कोरोनाची रुग्णवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णवाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. आता कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून प्रथम रात्रीची संचारबंदी (Night Curfew) कडक करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. देशातील 41 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनाचा संसर्ग दर असल्याने केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची केंद्राची सूचना केली आहे. असे असताना आता उत्तर प्रदेशातही रात्रीची संचारबंदी (Night Curfew ) लागू करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी याबाबत ट्विट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात पुन्हा रुग्णवाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्र आणि केरळ राज्याला सर्तकतेचे आदेश देताना रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत सूचविले आहे. त्यामुळे याठिकाणी आता रात्रीची संचारबंदी लागू होण्याची शक्यता आहे. केरळबरोबरच दुसऱ्या क्रमांकाची दैनंदिन रुग्णवाढ महाराष्ट्रात झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही कायम आहे. त्यामुळे काळजी घेण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे संकेत दिले आहेत.


देशात तिसऱ्या लाटेचा धोका आहे. (Corona Third Wave) त्यामुळे कोरोनात वाढ होऊ नये म्हणून आतापासून खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, लखनऊच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाबत संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये कोरोनाबाबत लक्ष देण्याबाबत माहिती समोर आली.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, लखनौच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाबत संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये मनोरंजक तथ्ये समोर आली आहेत.



उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) रात्रीचा कडक कर्फ्यू  (Night Curfew) असेल, असे मुख्यमंत्री योगी यांनी केरळ-महाराष्ट्रातील (Maharashtra Corona Update) कोरोनाच्या वाढत्या रुग्णवाढीनंतर हा आदेश दिला आहे. मुख्यमंत्री गुरुवारी उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील कोविड -19 च्या परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की सततच्या घेतलेल्या प्रयत्नामुळे कोरोना संक्रमणाचे प्रमाण सर्वात कमी पातळीवर आहे. कोरोना विषाणूबाबत थोडासा निष्काळजीपणा देखील भारी पडू शकतो. त्यांनी बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि विमानतळांवर पूर्ण तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.


ते म्हणाले की, पोलिसांनी इशारा जारी करावा जेणेकरून रात्री 10 पर्यंत दुकाने बंद होतील. ते म्हणाले की लोकांनी अनावश्यक रस्त्यावर फिरू नये. मुख्यमंत्र्यांना बैठकीत माहिती देण्यात आली की सध्या राज्यात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 342 आहे. अलीगढ, बांदा, बिजनोर, एटा, फर्रुखाबाद, फतेहपूर, गोंडा, हमीरपूर, हरदोई, कानपूर देहाट, महोबा, मौ, रामपूर, संत कबीरनगर, शाहजहांपूर आणि उन्नाव या जिल्ह्यांमध्ये सध्या कोविड -19 चा एकही रुग्ण नाही. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशात कोरोनाचे 19 नवीन रुग्ण सापडल्यानंतर राज्यातील एकूण बाधितांची संख्या 17,09,192 झाली आहे. त्याचवेळी, आतापर्यंत 22,794 मृत्यू झाले आहेत.