Vaccine Dose : कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर जगभरात यावर औषध शोधण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु झाले होते. 2 वर्ष कोरोनाने अनेकांचे जीव घेतले. कोरोनामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. कोरोनावरील लस लवकरात लवकर यावी यासाठी प्रार्थना केली जात होती. अखेर भारतात देखील कोरोनावर लस विकसित केली गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने लसीकरण मोहिम राबवली आणि आतापर्यंत करोडो लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या ही अधिक आहे. 2 डोस घेतल्यानंतर तिसरा बुस्टर डोस घेण्यासाठी 9 महिन्यांचं अंतर निश्चित करण्यात आलं आहे. पण आता यात काही बदल होण्याची शक्यता आहे. 


लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI) गुरुवारी कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोसमधील अंतर सध्याच्या नऊ महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. हा गट सहा ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी Covavax आणि Corbevax वरील डेटाचे देखील पुनरावलोकन करेल. NTAGI ची ही बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत. सध्या 12 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या मुलांचे लसीकरण केले जात आहे.


एप्रिलमध्ये देशाच्या औषध नियंत्रक जनरल ऑफ मेडिसिन्स (DCGI) ने 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी Corbevax आणि सहा ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी Covaxin च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली. वरील दोन विषयांव्यतिरिक्त, NTAGI च्या स्थायी तांत्रिक उप-समितीच्या (STSC) बैठकीच्या अजेंड्यावर मिश्र डोस मंजूर करण्याच्या शक्यतेचा देखील विचार केला जाणार आहे.


देशात कोरोना संसर्ग वाढला


देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. दररोज रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. मुंबईसह राज्यात ही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.