Covid 19 | 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना मिळणार आता ही लस, मोठा निर्णय
देशात 16 मार्चपासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले. लसीकरणाची व्याप्ती सातत्याने वाढविण्यात येत आहे.
नवी दिल्ली : देशात 16 मार्चपासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले. लसीकरणाची व्याप्ती सातत्याने वाढविण्यात येत असून प्रत्येक वयोगटातील बालकांना लस देण्याचा प्रयत्न शासन करत आहे.
भारतीय औषध नियंत्रक जनरल ( DCGI ) यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना लस दिली जाणार आहे. यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मान्यता देण्यात आली आहे.
भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लसीच्या आपत्कालीन वापरास DCGI ने मान्यता दिली. भारतीय औषध नियंत्रक जनरलच्या विषय तज्ञ समितीने गेल्या आठवड्यात कॉर्बेवॅक्स लसीचा वापर करण्याची शिफारस केली होती. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही शिफारस करण्यात आली होती.
हैद्राबाद स्थित फर्म बायोलॉजिकल-ई ने विकसित केलेली Corbevax ही देशातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे.