कोरोना रूग्णसंख्या घटत असताना 24 तासांत पुन्हा रूग्णवाढ, इतक्या लोकांचा मृत्यू
गेल्या 24 तासांत 1.59 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबई : कोरोना रूग्णसंख्या घटत असताना 24 तासांत पुन्हा रूग्णवाढ झाली आहे. मंगळवारी 86 हजार 498 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली होती. पण गेल्या 24 तासांत 90 हजारपेक्षा जास्त रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 हजार 213 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रूग्णांची देखील मोठी आहे. कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा काही प्रमाणात वाढल्यामुळे नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 91 हजार 227 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 हजार 213 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2 कोटी 90 लाख 88 हजार 176 पोहोचली आहे. आता पर्यंत 3 लाख 53 हजार 557 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत 1.59 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रूग्णांची संख्या 2 कोटी 74 लाख 96 हजार 198 इतकी आहे. भारतात सध्या 12 लाख 38 हजार 421 रूग्णांवर उपचार सुरू आहे.