मुंबई : कोरोना लसीकरणाची गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेली तयारी पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे. देशातील सर्वच राज्य आणि सर्व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये उद्या कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासाठी महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची निवड करण्यात आलीये. नागपूर, पुणे, जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन होणार आहे. प्रत्यक्ष लस दिली जाणार नसली तरी लसीकरणावेळी करावी लागणारी सर्व सिद्धता करण्यात येणार आहे.


नागपुरातही तीन ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे. डागा हॉस्पिटल, महापालिकेचं के टी नगर आरोग्य केंद्र आणि कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात याची तयारी पूर्ण झालीये. नियोजनबद्ध पद्धतीनं लसीकरण करता यावं, म्हणून हा ड्राय रन घेण्यात येतोय. तिन्ही ठिकाणी प्रत्येकी 25 जणांची निवड करण्यात आलीये. प्रत्येक केंद्रावर आरोग्य विभागाची सुमारे आठ डॉक्टरांची टीम आणि इतर यंत्रणा सज्ज राहिल. 



तसेच सिरम आणि भारत बायोटेकच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. २ जानेवारीपासून संपूर्ण देशभरात कोरोनाच्या लसीची रंगीत तालिम सुरू होणार आहे.