मुंबई : आता कोरोना लसीसंदर्भात (Corona Vaccine) एक अतिशय चांगली बातमी आहे. भारतीयांना आता आणखी एक स्वदेशी लस मिळणार आहे. विशेष म्हणजे ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार नाही. जाणून घेऊयात कोणती आहे ही लस आणि तिची खासियत काय आहे.  कोरोनाविरोधातल्या लढाईत भारताच्या हाती आता आणखी एक रामबाण लस आलीय. या लसीचं नाव आहे (Zycov D Vaccine)  'झायकोव्ह डी'. (Covid 19 Zydus Cadila vaccine for Worlds first DNA based vaccine) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही लस अहमदाबादच्या लॅबमध्ये तयार झालेली ही संपूर्ण स्वदेशी आहे. लहान मुलांसाठी प्रभावी असल्याचा दावा केला जातोय. झायकोव्ह डीच्या आपात्कालीन वापराला देशात परवानगी मिळालीय. 



या लसीची खासियत म्हणजे ती पहिली DNA लस आहे. ही लस इंजेक्शनमधून दिली जाणार नसल्यानं कोणत्याही वेदना होणार नाहीत. शिवाय ती 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवता येईल. 12 वर्षावरील सर्वांसाठी ही लस अत्यंत प्रभावी ठरेल असा दावा झायडसने केलाय. देशात 28 हजार लोकांवर लसीची चाचणी करण्यात आली. त्यात ही लस 66.6 टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं. झायकोव्ह डीचे 4-4 आठवड्याच्या अंतरात तीन डोस दिले जातील.


आतापर्यंत भारतात पाच लसींच्या वापराला परवानगी देण्यात आलीय. या पाचही लशी इंजेक्शनद्वारे दिल्या जातात. मात्र झायकोव्ह डीच्या रूपात पाहिल्यांदाच भारतीयांना इंजेक्शनरहित लस मिळणारंय. शिवाय ती DNA स्वरूपात असल्यानं तिची परिणामकारकता जास्त असेल अशी आशा करायला हरकत नाही.