Covid Omicron XBB  Variant : कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून शेजारी राष्ट्र चीनमध्ये हैदोस घालायला सुरूवात केली आहे. चीनमध्ये लाट येणार असून यामध्ये 80 कोटी लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनाचे नवीन व्हेरियंट समोर येत असून ते अत्यंत धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. अशातच Covid Omicron XBB या नवीन व्हेरियंटबद्दल सोशल मीडियावर माहिती फिरत आहे. याबाबत केंद्र सरकारने मोठा खुलासा केला आहे. (Covid Omicron XBB variant in india can not be detected easily know the truth behind it latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड ओमिक्रॉन एक्सबीबी व्हेरियंटच्या लक्षणांमध्ये, व्यक्तिला ताप किवा कफ होत असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल मेसेजमध्ये Covid Omicron XBB व्हेरियंट, सांधेदुखी, न्यूमोनिया, पाठदुखी, मानदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणे आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा Covid Omicron XBB व्हेरियंट पाचपटीने धोकादायक असल्याचंही मेसेजमध्ये सांगितलं आहे. Covid Omicron XBB व्हेरियंटची लागण झालेल्या रूग्णांची कमी वेळात अवस्था गंभीर होते. सुरूवातीला तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.


मेसेज मोठ्या प्रमाणाता व्हायरल होत असल्याने सरकारने या मेसेजची दखल घेतली. भारत सरकारने Covid Omicron XBB या व्हेरियंटबाबतची माहिती आणि लक्षणांविषयी खुलासा केला आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असून दिशाभूल करणारा असल्याचं सांगितलं आहे. 



दरम्यान, केंद्र सरकारने  सर्व राज्यांनी कोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष केंद्रित करा असंही यामध्ये सांगण्यात आलंय. तसंच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.