COVID subvariant JN.1 in Kerala : जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसंबंधी इशारा दिला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN1पासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा WHOनं दिला आहे. धक्कादायक म्हणजे  केरळच्या त्रिवेंद्रममध्ये JN1 हा नवा व्हेरिएंट सापडला आहे. त्यामुळे सर्व राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. 


भारतीय आरोग्य यंत्रणेची झोप उडाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूचा आणखी एक नवीन प्रकार भारतात सापडल्याने भारतीय आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. JN.1 चा पहिला पुग्ण आढळला आहे.   कोविड-19 चा हा उपप्रकार केरळमध्ये नोंदवला गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सर्व राज्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.   खबरदारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील सर्व आरोग्य सुविधांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन केले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. 8 डिसेंबर रोजी हा नवा व्हेरिएंट आढळला आहे. 18 नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणीत 79 वर्षीय महिलेचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. महिलेला इन्फ्लूएंझा सारखी आजार (ILI) ची सौम्य लक्षणे होती आणि ती कोविड-19 मधून बरी झाली होती. 


केरळ सरकार अलर्ट मोडवर 


कोविडचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर केरळ सरकार अलर्ट मोडवर आहे. आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी तातडीची बैठक घेतली.  मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. केरळची सीमा बंद न करण्याच निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. 


सध्या देशातील कोविड रुग्णांची स्थिती


सध्या देशातील कोविड-19 प्रकरणांपैकी 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणे गंभीर नाहीत. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते त्यांच्या घरात एकटे राहत आहेत. यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीय प्रवाशाला JN.1 चा संसर्ग आढळून आला होता. हा व्यक्ती मूळचा तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबरला तो सिंगापूरला गेला होता. तिरुचिरापल्ली जिल्ह्यात तसेच तामिळनाडूमधील इतर ठिकाणी JN.1 च्या संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. मात्र, अशा रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. 


नागरीकांना खबरदारी घेण्याच्या सूचना


पुन्हा एकदा कोविडचा धोका वाढल्याने नागरीकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्क घालावा तसेच श्वसनासदंर्भात त्रास असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.