नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशात कोरोना रुग्णांनी १० लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये जवळजवळ १ लाख नागरिक कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ३६ हजार ९५६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ६८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे देशाला असंख्य संकटांना सामोरे जावे लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ठाण्या पाठोपाठ हैदराबादमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. याठिकाणी २८ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 



भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या १० लाख ३८ हजार ८३२ वर पोहोचली असून ३ लाख ४२ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत.


देशात आतापर्यंत ६ लाख ३५ हजार ७५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २५ हजार ६०२ रुग्णांनी कोरोना व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहे.