नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे (Covid 19) प्रमाण कमी होत असताना कोरोना बहुप्रतिक्षित कोरोना वॅक्सिनच्या (Corona Vaccine) वितरणाची तयारी वेग धरु लागलीय. वर्षभर कोरोनासोबत लढाई सुरु असताना आता लवकरच कोरोना वॅक्सिन जनतेपर्यंत पोहोचणार आहे. अशात आरोग्य मंत्रालयाने वॅक्सिन पोहोचवण्यासाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत. सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असणाऱ्यांना हे वॅक्सिन दिले जाणार आहे. प्रत्येक बूथवर शंभर जणांना वॅक्सिन दिले जाईल. गाईडलाईन्सनुसार प्राथमिकता ठरवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतामध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा ९८ लाख ५७ हजार २९ झालाय. यामधील ९३ लाख ५७ हजार ४६४ जण उपचारानंतर ठीक झाले आहेत. तर ३ लाख ५६ हजार ५४६ जण अजूनही एक्टीव्ह रुग्ण आहेत. 


देशामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ४३ हजार १९ जणांचा मृत्यू झालाय. देशामध्ये कोरोना रिकव्हरी रेट ९५ टक्के तर मृत्यूदर १.४५ टक्के आहे. देशात एक्टीव्ह रुग्णांचा दर ४ टक्के आहे. 



कोरोना (Corona Virus) प्रतिबंधक 'लस'च्या (Corona Vaccine) आपत्कालीन परवान्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपन्यांनी केलेले अर्ज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने प्रलंबित ठेवलेत. 'कोरोना लस'बाबत आणखी तपशील सादर करण्याची सूचना समितीने दोन्ही कंपन्यांना केली आहे. त्यामुळे कोरोनावरील 'लस'ची (Corona Vaccine) वाट पाहणाऱ्या भारतीयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


कोरोनावरील 'लस'च्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची मागणी करणारे अर्ज फायझर कंपनीपाठोपाठ सीरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक यांनी केले होते. या तिन्ही कंपन्यांच्या अर्जाबाबत तज्ज्ञ समितीने काल चर्चा केली. 'कोरोना लस'च्या परिणामकारकतेच्या दाव्याला बळकटी देणाऱ्या तपशिलाची गरज असल्याचे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. मात्र तिन्ही कंपन्यांनी हा तपशील सादर केलेला नाही. 


फायझर कंपनीची लस वेगळी म्हणजे ‘एमआरएनए’ पद्धतीची आहे. त्यावर अभिप्राय देऊ शकणारे तज्ज्ञ बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे फायझरच्या 'लस'बाबत निर्णय झाला नाही. तसेच अपुऱ्या तपशिलामुळे सिरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक यांच्या अर्जावर निर्णय घेता आला नाही. या कंपन्यांना पुढील बैठकीआधी संपूर्ण तपशील सादर करण्याची सूचना समितीने केली आहे. त्यानंतर 'कोरोना लस'बाबत निर्णय होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यत 'कोरोना लस' उपलब्ध होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.