मुंबई : गायीने सामान्य नागरीकांना ठोकर मारल्याच्या अनेक व्हिडिओ अथवा घटना आपण पाहिल्या असतीलच. या घटनेतही तसंच झालं आहे. मात्र यात सामान्य माणूस नाही तर एका उपमुख्यमंत्र्याला एका गायीने शिंगावर घेतल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निरनिराळे कार्यक्रम सुरु आहेत. कोणी तिरंगा रॅली काढतंय, तर कोणी हर घर तिरंगा मोहिमेत सहभाग नोंदवतोय. अशाच एका तिरंगा रॅली दरम्यान गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel Injured) यांना गायीने टक्कर दिल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


व्हिडिओत काय?
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, नितीन पटेल (Nitin Patel Injured)  हे तिरंगा यात्रा काढत होते. पटेल हातात तिरंगा झेंडा घेऊन रॅलीमध्ये सर्वात पुढे दिसत आहेत. इतक्यात एक गाय त्यांच्याकडे धावत येते आणि त्यांना ढकलून रॅलीत घुसली. नितीन पटेल  (Nitin Patel Injured) यांना गाईची धडक बसताच ते रस्त्यावर कोसळले. या घटनेत त्यांच्या  पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.



दरम्यान या घटनेनंतर राजकिय वर्तुळात एकचं खळबळ उडाली आहे. अनेक नेत्यांनी नितीन पटेल (Nitin Patel Injured)  यांना दुखापतीत लवकरच बरे होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.