बछड्यांसाठी रूग्णालयापर्यंत धावणारी गाय, व्हिडिओ व्हायरल
बाळावर संटक आले की कोणत्याही आईचं काळिज कसं होत असेल याचा अंदाज सर्वांनाच असेल.
बेंगळुरू : बाळावर संटक आले की कोणत्याही आईचं काळिज कसं होत असेल याचा अंदाज सर्वांनाच असेल. आपल्या बाळावरील आईचं हे प्रेम केवळ मनुष्यांमध्येच नाहीतर जनावरांमध्येही बघायला मिळतं. याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. असाच एक अनुभव नुकताच बंगळुरूमध्ये पुन्हा आलाय.
कुठे घडली घटना?
ही हृद्यस्पर्शी घटना बेंगळुरूमधील हावेरी शहरात घडली आहे. आपल्या बछड्याच्या मागे एक गाय रूग्णालयापर्यंत पळत गेली. या आईची ही धाव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय झालं नेमकं?
हावेरीमधील रस्त्यावर भटकणाऱ्या गायीचे दोन महिन्याचे बछडे जखमी होऊन जमिनीवर कोसळले. गंभीर जखम झाल्याने बछडे बेशुद्ध् पडले. काही नागरिकांनी ही माहिती पशू रूग्णालयाला दिली. कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. कर्मचाऱ्यांनी बेशुद्धावस्तेतील बछड्याला उचलून टॅम्पोमध्ये घातले. अत्यंत काळजीने ती बछड्याकडे पाहत होती.
अन गाय काही थांबेना....
टेम्पो सुरू तशी ती गाय गाडीच्या पाठोपाठ धावू लागली. गाडीच्या मधे आडवे येऊन टॅम्पो थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. पण तीला ते शक्य झाले नाही. गाडीतील कर्मचारी तिला हाकलत होते पण ती काही थांबेना. बछड्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याची आई रूग्णालयाच्या दारातच उभी होती आणि आपल्या बछड्यांकडे पाहात होती.