`गाय पुजनिय आहे, गोरक्षकांना थांबवणार तरी कसं?`, चरखी दादरी हत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
हरियाणामधील चरखी दादरी जिल्ह्यात गोमास खाल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली आहे 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यावर मुख्यमंत्री नयाब सायनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गाय पुजनिय आहे, गोरक्षकांना थांबवणार तरी कसं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या प्रतिक्रियेवरुन वाद होण्याची शक्यत आहे.
हरियाणामधील चरखी दादरी जिल्ह्यात गोमास खाल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली आहे.ही हत्या गोरक्षक दलातील काही कार्यकर्त्यांनी केल्याचे समोर आले आहे.गोरक्षकांना संशय आला की साबिर मलिक नामक एक व्यक्ती गोमासाचे सेवन करत आहे आणि या संशयातूनच पुढील प्रकार घडून आला. 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हा सगळा प्रकार 27 ऑगस्टला घडल्याच समोर येत आहे. यावर मुख्यमंत्री नयाब सायनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गाय पुजनिय आहे, गोरक्षकांना थांबवणार तरी कसं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या प्रतिक्रियेवरुन वाद होण्याची शक्यत आहे.
कोण होता साबिर मलिक?
साबिर मलिक 26 वर्षीय तरूण होता , कचरा गोळा करून विकायच काम तो करायचा. तो कामानिमित्त हरियाणामध्ये आला होता .तो पश्चिम बंगालचा रहिवासी होता. साबिर मलिक विवाहीत असून त्याला 2 वर्षाची मुलगी आहे. चारखी दादरीमध्ये हांसावास गावात पत्नी आणि मूली समवेत राहायचा. मलिकला गोरक्षकांनी प्लास्टिक घेयला बोलवले आणि सर्व प्रकार घडला.
मारहाणीत झाला मृत्यू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिक कचरा विकायचे काम करायचा, गून्हेगारांना मलिक गोमास खातो असा संशय आल्यावर त्यांनी मलिकला प्लास्टिकच्या बाटल्या घ्यायला बोलवले आणि दुकानावर बोलवून चोप दिला. काही लोकांनी मलिकला वाचवायचा प्रयत्न केला होता. नंतर ते त्याला दूसऱ्या जागेवर घेऊन गेले आणि पुन्हा मलिकला खूप मारले, त्याचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला. पकडल्या गेलेल्या आरोपींमध्ये 2 किशोरवयीन मूले आहेत.
भारतीय न्याय संहिते अंतर्गत पाचही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.विरोधी पक्ष नेते आता या प्रकरणात प्रतिक्रीया देत आहेत.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
27 ऑगस्टला घडलेला प्रकार दुर्देवी आहे , मात्र घटनेला सामूहीक
हत्या म्हणू नये, असे हरियाणाचे मुख्यमंत्री नयाब सायनी म्हणाले. गोरक्षणासाठी राज्यात कडक कायदे लागू केलेले आहेत आणि त्यात काहीही तडजोड केली जाणार नाही .गावातील रहिवासी गाय पुजनिय मानतात, गावकऱ्यांना जर कोणी गोमास खाताना दिसले तर ते साहाजिकच प्रतिकार करणार आणि मग पुढे काय घडेल ते सांगू शकत नाही मात्र अश्या दुर्देवी घटना घडणे फार वाईट असल्याचे ते म्हणाले.