धक्कादायक : क्रेन कोसळून ११ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
हजारो किलो वजनाची क्रेन अचानक अंगावर पडल्यामुळे...
आंध्र प्रदेश : येथील विशाखापट्टनममध्ये एक दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशाखापट्टनममधील 'हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड' परिसरात अचानक क्रेन कोसळल्यानं मोठा अपघात घडला. हजारो किलो वजनाची क्रेन अचानक अंगावर पडल्यामुळे या भागात काम करणाऱ्या ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
याठिकाणी सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अडकलेल्या कामगारांपैकी कित्येक जण गंभीर जखमी देखील झाले आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एएनआय वृत्तसंस्थेने या बातमीला दुजोरा दिला आहे.
व्हिडिओमध्ये क्रेन कशाप्रकाारे कोसळली हे स्पष्ट दिसत आहे.
डीसीपी सुरेश बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर थोड्याचं वेळात ही संख्या ११ वर पोहोचली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील डीसीपी सुरेश बाबू यांनी वर्तवली आहे.