Creative Resume For Google: कोणत्याही नोकरीत अर्ज करण्यासाठी रिझ्युम (Creative Resume) महत्वाचे असते. कारण या रिझ्युममध्ये लिहलेल्या गोष्टीवरूनच तुम्हाला जॉब मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या प्रमाणे रिझ्युम बनवत असतो. आता अशाच एका तरूणाने गुगलमध्ये नोकरी (Google Job) मिळवण्यासाठी रिझ्युम बनवला आहे. हा रिझ्युम पाहून गुगलला आश्चर्याचा धक्का बसला असावा, असे नक्कीच वाटतेय. त्यामुळे नेमकं अस या रिझ्युममध्ये काय आहे? ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : लोकलच्या भरगच्च गर्दीत 'ती' एकटीच चढली आणि मग पुरुष प्रवाशांनी...VIDEO व्हायरल 


रिझ्युम व्हायरल 


सोशल मीडियावर सध्या एक रिझ्यूम (Creative Resume) प्रचंड व्हायरल होत आहे. या रिझ्युममधील क्रिएटीव्हीटी पाहून त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्यामुळे या रिझ्युमचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


रिझ्युममध्ये काय?


सोशल मीडियावर रिझ्युमचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हे रिझ्युम गुगल सर्च बार टाईपमध्ये बनवण्यात आला आहे. या रिझ्युमध्ये सब-हेडिंगमध्ये (Sub-headings) शिक्षण (Education) असं टायटल देण्यात आले आहे. या टाययल खाली शिक्षणासंबधित सर्व माहिती देण्यात आली आहे. तसेच त्याखाली वर्क एक्सपिरीयन्स (Work Experience) म्हणजेच कामाच्या अनुभवाची माहिती देण्यात आली आहे. तसेच गुगल सर्च रिजल्टसची डिझाईन देखील दिसेल, यामध्ये तुम्हा टेम्प्लेट आणि सर्च बार सोबत लिंक दिसणार आहे. या ऱिझ्युमची विशेष बाब म्हणजे हे संपुर्ण डिझाईन गुगल क्रोमच्या डार्क मोड थीमवर बनवण्यात आले आहे.  


कोणी बनवलंय रिझ्युम? 


LinkedIn युझर आदित्य शर्मा (Chief Executive Officer at HiCounselor) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Co-Founder) यांनी अशा प्रकारे क्रिएटीव्ह रिझ्यूम तयार केला आहे. हा रिझ्यूम शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गुगल ही अनेक लोकांची ड्रीम कंपनी आहे, पण ती खूप निवडक आहे, म्हणून मी एक क्रिएटिव्ह रिझ्युम घेऊन आलो आहे. 
Google डार्क थीमवर हे रिझ्यूम घेऊन आलो आहे. हे डिझाईन बनवण्यासाठी मी फिग्मा वापरला आहे, कृपया मला तुमचा अभिप्राय द्या, असे आवाहनही त्याने केले आहे.  



दरम्यान ही पोस्ट 13 नोव्हेंबर रोजी लिंक्डइनवर शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट नेटकऱ्यांना खुप आवडली आहे. आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे, तर 58 जणांनी ती पुन्हा पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.