मुंबई : आजच्या युगात, लोकं क्रेडिट कार्डचा वापर वारंवार करतात. लोकांना कोणती गोष्ट विकत घ्यायची असेल आणि पगार यायला उशिर होणार असेल, तर लोकं क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे घेऊन नंतर ते पैसे फेडू शकतात. आता बरेच असे लोकं आहेत ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड आहेत. अनेक बँका क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी ग्राहकांना आकर्षक ऑफर देखील देत असतात. तुम्हाला यासंधर्भात बऱ्याचवेळा फोन देखील आला असेल की, तुम्हाला या बँकेचे क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल, तर तुम्ही त्यासह या ऑफरचा फायदा देखील घेऊ शकता.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रेडिटकार्ड अगदी सहज बनवले जातात, ज्यामुळे लोकं त्यांना आवश्यक नसतानाही क्रेडिट कार्ड बनवतात. जर तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरायचे नसेल, तर ते बनवून घेऊ नका. कारण तुम्हाला दरवर्षी त्याची वार्षिक फी भरावी लागेल.

जर तुम्ही असा विचार केलात की, जर बिल आले तर मी त्याला बंद करुन टाकेन परंतु ते सहजा सहजी शक्य नाही. जर तुम्ही क्रेडिट कार्ड बंद करू इच्छित असाल तर प्रथम तुम्हाला तुमचे थकित बिल भरावे लागेल. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डची वार्षिक फी देखील भरावी लागेल. आपण ही फी वेळेवर न भरल्यास वेळानुसार ही फी वाढत जोते आणि जर एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असेल तर मग, तुमचे किती बिल येईल? याचा जरा विचार करा.

तुम्हाला जर क्रेडिट कार्ड बंद करायचा असेल तर तुम्हाला ईमेलद्वारे विनंती पाठवावी लागेल. तुम्ही बँकेत जाऊन तुमचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज देखील देऊ शकता. क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा कोणताही ठरावीक नियम नाही. हे वेगवेगळ्या बँकांच्या कामकाजावर अवलंबून असते.

बँक ई-मेल वर विनंती पाठवते

तुमची विनंती मंजूर झाल्यानंतर, बँक तुम्हाला ई-मेलवर थकबाकी भरण्यासाठी लिंक देण्यात येईल. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला थकबाकी भरावी लागेल. यानंतर, तुमच्या ईमेलवर एक कन्फर्मेशन मेल येईल की, तुमचे क्रेडिट कार्ड बंद केले गेले आहे.

तुम्हाल कन्फर्मेशन मेल आला नाही तर त्याबद्दल बँकेला कळवा. लक्षात ठेवा, प्रत्येक बँकेचे क्रेडिट कार्ड बंद करण्याची प्रक्रिया वेगळी असू शकते.