पाटणा : Bihar Crime News : आता एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. हा सरकारचा अधिकारी आहे की कुबेरचा नातेवाईक, असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. इतकी त्याने माया कमी काळावधीत जमवली. बिहारमधील पाटण्यात भ्रष्टाचाराचा सूत्रधार सापडला आहे. (Bihar Crime News Corrupt Sub Inspector) इन्स्पेक्टरने एक कोटी रुपयांत तब्बल 8 भूखंड खरेदी केले. त्याच्यावर मणेरच्या वाळू माफियांकडून पैसे उकळल्याचा आरोप. त्याने आई आणि पत्नीच्या नावे मालमत्ता केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 भ्रष्टाचाराचा कळसच झाला आहे. याचे ताजे उदाहरण बिहारमध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स युनिटकडून (ईओयू) पुढे आले आहे. टाकण्यात आलेल्या छाप्यात आणि बिहार सरकारच्या एजन्सीजकडून भ्रष्टाचाऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईतून समोर आले आहे.


सध्या पाटणा येथून ही बातमी समोर आली आहे. जेथे EOU ने भ्रष्टाचार प्रकरणाबाबत रुपसपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख मधुसूदन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात इन्स्पेक्टर कारनामा बाहेर आला आहे. EOU ने निरीक्षकाकडे असलेल्या अमाप संपत्तीचा खुलासा केला आहे.


3 बँकांमध्ये वेगवेगळी खाती 


करोडपती ठाणेदाराची धक्कादायकबाब पुढे आली आहे. हा पोलीस अधिकारी 2009मध्ये सरकारी सेवेत दाखल झाला. एजन्सीने औरंगाबादच्या दौडनगर येथील चौराम गावातील वडिलोपार्जित घर, पाटणा येथील आनंद बिहार कॉलनी आणि रुपसपूर पोलीस ठाण्याच्या आवारात निरीक्षकांच्या घरावर छापे टाकले आणि झडतीदरम्यान आठ लाख 93 हजारांची रोकड जप्त केली.


याशिवाय एजन्सीला एसबीआयचे दोन, पीएनबीचे दोन आणि कॅनरा बँकेचे एक पासबुक मिळाले. ही सर्व पासबुक्स इन्स्पेक्टरच्या घरातून सापडली आहेत. एजन्सीने अनेक ठिकाणची गुंतवणुकीची कागदपत्रेही जप्त केली आहेत.


2009 च्या बॅचचे थेट नियुक्त निरीक्षक आणि रूपसपूर पोलीस स्टेशनबद्दल माहिती EOUला देण्यात आली होती की, पाटणा जिल्ह्यातील मणेर येथे पोस्टिंग दरम्यान इन्स्पेक्टरचा वाळू माफियांशी संबंध होता. पडताळणी दरम्यान, एजन्सीला असे आढळून आले की, निरीक्षकाच्या पत्नीच्या खात्यात भरपूर पैसे आहेत. तसेच पोलीस निरीक्षकाने मिळकतीपेक्षा 8 कोटी 73 लाख चार हजार 109 रुपयांची बेकायदा मालमत्ता गोळा केली आहे.