Crime News : ब्रिटनमध्ये महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका भारतीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या प्रसिद्ध थेम्सनदीमध्ये या भारतीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. शिक्षणसाठी ब्रिटनमध्ये गेलेल्या बेपत्ता तरुणाचा महिन्याभरातनंतर मृतदेह सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, हे प्रकरण संशयास्पद वाटत नसल्याचे ब्रिटन पोलिसांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमध्ये महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेला एक भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह थेम्स नदीत सापडला आहे. पोलिसांनी सांगितले की, मीतकुमार पटेल (23) नावाचा विद्यार्थी सप्टेंबर महिन्यात उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेला होता. त्यानंतर 17 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. सकाळी तो मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला. मात्र मेट्रोपॉलिटन पोलिसांना 21 नोव्हेंबर रोजी पूर्व लंडनच्या कॅनरी वार्फ परिसराजवळ थेम्स नदीत त्याचा मृतदेह सापडला आहे.


मितेशकुमारच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. दुसरीकडे मीतकुमारचे नातेवाईक पार्थ पटेल यांनी त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी 'गो फंड मी' ही ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. पार्थ पटेल यांनी निधी उभारण्यासाठी आवाहन केले आले. मीतकुमार पटेल हा 23 वर्षीय व्यक्ती होता जो 19 सप्टेंबर 2023 रोजी उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला आला होता. तो शेतकरी कुटुंबातील असून गावात राहत होता. मीतकुमार 17 नोव्हेंबर 2023 पासून बेपत्ता होता. 21 नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. हे आपल्या सर्वांसाठी खेदजनक आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी निधी गोळा करण्याचा आणि त्याचा मृतदेह भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला, असे पार्थ पटेल यांनी म्हटलं आहे.


हा निधी मीतकुमारच्या भारतातील कुटुंबाकडे सुरक्षितपणे हस्तांतरित केला जाईल, असेही पार्थ पटेल यांनी म्हटलं आहे. 'इव्हनिंग स्टँडर्ड' वृत्तपत्राच्या बातमीनुसार, मीतकुमार 20 नोव्हेंबर रोजी शेफिल्ड हलम विद्यापीठात पदवी घेण्यासाठी आणि अॅमेझॉनमध्ये नोकरी सुरू करण्यासाठी शेफिल्डला जाणार होता. तो मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. मात्र जेव्हा तो लंडनमधील त्याच्या घरी परतला नाही तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी मीतकुमार बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. तेव्हापासून मीतेकुमारचा शोध सुरु होता. अखेर थेम्स नदीत मीतेशकुमारचा मृतदेह सापडला आहे.