`सलमान खानला सोडणार नाही, संधी मिळाली तर...` गँगस्टर गोल्डी बरारची खुलेआम धमकी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या जीवाला गँगस्टर गोल्डी बरारपासून धोका आहे. आता तर गोल्डी बरराने सलमानला खुलेआम धमकी दिली आहे.
Salman Khan: सलमान खानला सोडणार नाही, संधी मिळताच त्याला मारु अशी खुलेआम धमकी भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बरारने (Goldie Brar) दिली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गोल्डी बरार यांनी ही धमकी दिली आहे. आपली गँग खलिस्तानला (Khalistan) पाठिंबा देत नसल्याचंही गोल्डी बरारने सांगितलं आहे. परदेशात बसून गोल्डी बरार भारतात गुन्हेगारी कारवाया करत आहे. भारतातल्या अनेक तपास संस्था त्याचा शोध घेतायत. इंटरपोलने (Interpole) देखील त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) जारी केली आहे. कॅनडा पोलिसातही त्याचं नाव वॉन्टेंड लिस्टमध्ये आहे. कॅनडात (Canada) त्याच्यावर दीड करोडचं बक्षीस आहे. पण गोल्डी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
सलमान खानला पुन्हा धमकी
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या (Sidhu Moosewala Murder Case) का केली याचाही गोल्डी बरारने खुलासा केला आहे. आता सलमान खान आमच्या टार्गेटवर असून संधी मिळाली तर त्यालाही मारु असंही गोल्डीने म्हटलं आहे. खलिस्तान किंवा आयएसआयचं समर्थन किंवा त्यांच्याबरोबर आपले काहीही संबंध नाहीत असंही गोल्डी बरारने म्हटलंय.
सलमानला अनेकवेळा धमकी
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानला लॉरेंन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि गोल्डी बरारने याआधीही अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 1998 पासून धमकी सत्राला सुरवात झाली. याच वर्षी काळवीट शिकारीत सलमान खानचं नाव समोर आलं होतं. आता प्रश्न असा आहे की लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरार यांचा काळविट शिकार प्रकरणाशी काय संबंध आहे. ते सलमान खानच्या जीवावर का उठले आहेत.
हे आहे कारण?
अभिनेता सलमान खानचं 1998 मध्ये काळविट शिकार प्रकरणात नाव समोर आलं होतं. तेव्हापासून बिश्नोई समाज सलमानच्या विरोधात गेले. त्याच्या चित्रपटावरही समाजाने बहिष्कार टाकला. इतकंच काय तर त्याच्या चित्रपटातील गाणीही या समाजात ऐकली जात नाहीत. गुन्हेगारी क्षेत्रात लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आल्यानंतर त्याने सलमान खानला थेट जीव मारण्याची धमकीच दिली.
सलमानच्या घराची रेकी
लॉरेन्स बिश्वोईला अटक केल्यानंतर त्याच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला. सलमान खानला जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. याची जबाबदारी राजस्थानमधला गँगस्टर संपत नेहरावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर संपत नेहरा मुंबईत आला आणि त्याने सलमानच्या घराची रेकी केली. पण अंतर जास्त असल्याने तो सलमानपर्यंत पोहोचू शकला नाही. रेकी दरम्यानच सलमान संपत नेहराच्या निशाण्यावर होता. पण त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलने जास्त दूरवर गोळीबार करु शकत नव्हता. त्यानंतरत्याने आपल्या गावाती दिनेश फौजी नावाच्या व्यक्तीकडून स्प्रिंग रायफल मागवली होती. स्प्रिंग रायफल लॉरेन्स बिश्नोईने अनिल पांड्या नावाच्या व्यक्तीकडून 3 ते 4 लाख रुपयांना विकत घेतली होती. ही रायफल दिनेश फौजीकडे ठेवण्यात आली. पण पोलिसांनी दिनेश फौजीला ट्रेस केलं आणि त्यानंतर संपत नेहरालाही अटक करण्यात आली.
काळविट आणि बिश्नोई समाज
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजातला आहे. हा समाज राजस्थानमधल्यो जोधपूरजवळच्या थार वाळवंट परिसरात राहातो. हा समाज निसर्गाश जोडला गेला आहे. जनावरांना ते देवासमान मानतात. विशेषत: काळविटाला समाजात जास्त मानलं जातं यासाठी ते ते जीवाची बाजीही लावतात. बिश्नोई समाजात काळविटाची पूजा केली जाते. राजस्थानमधल्याकाही गावात हरिणाच्या बछड्यांना इथल्या महिला आपलं दूध पाजतात. असे काही फोटोही व्हायरल झाले होते. हरिणाचं रक्षण करताना एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर त्या व्यक्तीला शहीदाचा दर्जा दिला जातो.
काळविट शिकार प्रकरण काय आहे?
1998 सप्टेंबर-ऑक्टोबर प्रकरणात जोधपूरमध्ये हम साथ साथ है चित्रपटाची शुटिंग सुरु होती. या दरमयान सलमान खान आपल्या काही कलाकारांसह भवाद गावात शिकारीला गेला. 27-28 ऑक्टोबरला घोडा फार्म हाऊसमध्ये काळविटाची शिकार केली गेली. त्याचा आरोप सलमान खानवर लावण्यात आला. याप्रकरणात सलमानला दोषी ठरवण्यात आलं होतं.