आधी तलवारीने वार आणि नंतर गोळी...; सूनेच्या प्रेम प्रकरणामुळे गेला सासूचा बळी, प्रियकराकडून निर्घृण हत्या
Crime News : सुनेच्या प्रेम प्रकरणाला विरोध केल्यामुळे सासूला महागात पडलंय आणि तिला आपल्या जीव गमवावा लागलाय.
Woman Murder Case : बिहारच्या पाटणामध्ये एक धक्कादायक आणि भयानक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या निर्घृण हत्येचा 24 तासांत पाटणा पोलिसांनी खुलासा केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेच्या विवाहबाह्य संबंधामुळे सासूचा जीव गेलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेच्या प्रेम प्रकरणामुळे सासूचा खून करण्यात आलाय. ही घटना देवरिया गावातील असून मनीष यादव यांची पत्नी गुड्डी देवी (40 वर्षे) हिची हत्या करण्यात आली. मृताच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या आणि गोळ्या झाडल्याच्या खुणा होत्या. यावरून महिलेला ठार मारण्यासाठी आधी तलवारीसारख्या शस्त्राने वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत होतं. नंतर गोळ्या झाडण्यात आल्याचे उघड झालं. या प्रकरणाचा खुलासा करताना डीएसपी म्हणाले की, सुनेच्या प्रेम प्रकरणाला विरोध करणे सासूला महागात पडले आणि तिला आपला जीव गमवावा लागला. (Crime News Daughter in law s love affair leads to mother in laws death murder by lover Woman Murder Case )
डीएसपीच्या म्हणण्यानुसार, अय्याश बहूच्या प्रियकराने सासू गुड्डी देवीची तलवारीने वार करून तिची हत्या केली होती. पोलिसांनी मुख्य आरोपी सुंदर यादव याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेली तलवार, देशी बनावटीचे पिस्तूल, गोळीचे केस आणि खोडून काढलेली गोळी जप्त केली आहे. पालीगंज डीएसपी 1 प्रीतम कुमार यांनी सांगितले की, 15 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास सिगोरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांना देवरिया गावात गुड्डी देवी नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जिथे महिलेचा तलवारीने वार करून आणि गोळ्या झाडून खून केल्याचे आढळून आले.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एक तलवार जप्त केली. देवरिया गावातील मुख्य आरोपी सुंदर यादव याने खून केल्याची माहिती येथे मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली. चौकशीत त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक कवच आणि एक गोळी जप्त करण्यात आली आहे. आरोपी सुंदर यादव याचं मृत महिलेची सून गुड्डी देवी हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. ज्याला सासू गुड्डी देवी विरोध करत असे. याचा बदला घेत मुख्य आरोपीने महिलेची हत्या केली. आरोपीसह सुनेला कारागृहात पाठविण्याची कारवाई सुरू आहे.