Crime News :  सोशल मीडियावर (social media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक जण रिल्स (Reels) बनवून ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. व्हिडिओवर जास्तीत जास्त लाईक्स (Likes) आणि कमेंट्स  (Comments) मिळावेत यासाठी काय पाहिजे ते करण्याची त्यांची तयारी असते. बऱ्याचदा व्हिडिओ बनवताना जीवाचीही पर्वा करत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्राम (Instagram) आणि टिकटॉक (TikTok) बनवण्याचं वेड एका महिलेच्या जीवावर बेतलं. वैतागलेल्या पतीनेच तिला कायमचं संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
तामिळनाडूमधल्या (Tamilnadu) डिंडुगल इथली ही घटना आहे. मृत चित्रा या महिलेला इन्स्टाग्रामवर रिल्स बनवायचं वेड होतं. सोशल मीडियावर ती बराच वेळ घालवत असल्याने यावरुन अनेकवेळा पतीचं आणि तिचं भांडण होत असे. महिलाचा पती अमृतलिंगम तेन्नमपलयम हा तिरुपूर इथल्या भाजी मार्केटमध्ये मजूर म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी चित्रा एका कपडे कारखान्यात काम करत होती. तिरुपूरमधल्या सेलम नगर इथे हे कुटुंब रहात होतं. 


चित्राला इन्स्टाग्राम रिल्सचं वेड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर रिल्स बनवायची. चित्राचे फॉलोअर्सही वाढत होते. यातूनच चित्राला अभिनयाचं वेड लागलं. यासाठी दोन महिन्यांपूर्वी ती चेन्नईलाही गेली होती. गेल्याच आठवड्यात ती मुलीच्या लग्नासाठी पुन्हा आपल्या घरी म्हणजे तामिळनाडूत परतली होती. 


पती अमृतलिंगमशी वाद
चेन्नईवरुन परतल्यानंतर चित्राचं पती अमृतलिंगमशी कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात पती अमृतलिंगमने शॉलने चित्राचा गळा आवळला. चित्रा बेशुद्ध पडल्याचं पाहाताच अमृतलिंगम घरातून फरार झाला. त्यानंतर त्याने आपल्या मुलीला फोन करुन घटनेची माहिती दिली. नवविवाहीत मुलीग तात्काळ माहेरी आली. पण तोपर्यंत चित्राचा मृत्यू झाला होता. मुलीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत काही तासातच आरोपी अमृतलिंगमनला अटक केली.