Crime : अजय देवगनचा `भोला` पाहिला आणि पतीने पत्नीला धू धू धुतला... कारण हैराण करणारं
पत्नी आपल्या पतीबरोबर अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला भोला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले. चित्रपट संपल्यानंतर पती-पत्नी घरी आले आणि पतीने पत्नीला जबर मारहाण केली. इतकंच नाही जीवे मारण्याची धमकीही दिली.
Crime News : चित्रपट पाहून आल्यावर पतीने पत्नीला जबर मारहाण केल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. अजय देवगण ( Ajay Devgan) आणि तब्बू (Tabu) यांची प्रमुख भूमिका असलेला भोला (Bhola) हा चित्रपट 30 मार्चला देशभर प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्याचा हट्ट पत्नीने पतीकडे केला. पतीनेही पत्नीचा हट्ट पुरवत तिला चित्रपट पाहाण्यासाठी चित्रपटगृहात नेलं. पण चित्रपट संपल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. वाद इतका टोकाला गेला की पतीने पत्नीला मारहाण केली. शेवटी हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं. पोलिसांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल केला.
काय आहे नेमकं प्रकरण
गुजरातच्या भुजमधलं (Gujrat Bhuj) हे प्रकरण आहे. भोला चित्रपट पाहण्यासाठी पत्नीबरोबर गेलेल्या पतीला हा चित्रपट आवडला नाही. इतक्या वाईट चित्रपटामुळे पैसे वाया गेल्याने पतीचं डोकं भडकलं. चित्रपटाचा राग त्याने पत्नीवर काढला. यावर पत्नीनेही उत्तर दिलं, त्यामुळे भांडण वाढत गेलं. शाब्दिक वादाचं रुपांत मारहाणीत झालं. पतीने पत्नीला जबर मारहाण केली. तसंच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. मारहाणीविरोधात पत्नीने पतीविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूजमधल्या नागरचकला परिसरात राहाणाऱ्या कृष्णाबा या महिले पती अमरसिंह मोडे याच्याविरोधात मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. कृष्णाबाने दिलेल्या माहितीनुसार ती पती अमरसिंहबरोबर भोला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेली. पण अमरसिंहला चित्रपट अजिबात आवडला नाही. चित्रपट पाहून पैसे वाया गेल्याचा अमरसिंहला राग आला. अमरसिंहच्या मारहाणीत कृष्णाबाला दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयता उपचार सुरु आहेत.
काय आहे 'भोला'ची कथा?
अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांची प्रमुख भूमिका असलेला भोला हा चित्रपट गेल्या 31 जानेवारीला संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झालाय. 'भोला' चित्रपट कैथी या दाक्षिणात्या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अजय देवगणमने भोलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा तुरुंगात असलेला कैदी भोला (अजय देवगण) आणि पोलीस अधिकारी डायना जोसेफ (तब्बू) यांच्या अवतीभोवती फिरणारी आहे.
डायना जोसेफ ही कर्तबगार पोलीस अधिकारी असते. ड्रग डिलरचा सामना करताना ड्रग्सचा मोठा साठा तिच्या हाती लागतो. या कारवाईमुळे बाहुबली अश्वत्थामाच्य निशाण्यावर ती येते. अश्वत्थामा पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याच प्लॅन बनवतो. सर्व बाजूंनी अडकलेल्या पोलीस अधिकारी डायनाल तुरुंगात बंद असलेल्या भोलाची आठवण येते.