Bihar Crime News :  बिहारमध्ये बोगस डॉक्टरचा धक्कादायक कारनामा उघड झाला आहे. या डॉक्टरने हर्नियाचे ऑपरेशन करताना रुग्णाचा महत्वाचा बॉडी पार्ट  कापला आहे. रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्या रुग्णालयामध्ये या रुग्णावर उपचार होतो ते रुग्णालय देखील बोगस असल्याचे तपासात समार आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुझफ्फरपूरमधील  सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. येथे शिवशक्ती नर्सिंग होम नावाचे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयातच रुग्णाच्या जीवाशी खेळ करणारा प्रकार घडला आहे. साक्रा वाजिद येथील रहिवासी कैलाश महतो असे पीडित रुग्णाचे नाव आहे. कैलाश यांच्यावर याच रुग्णालयात 10 एप्रिल रोजी हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  


शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडली


शस्त्रक्रियेनंतर कैलाश यांची प्रकृती बिघडली. कुटुंबियांनी त्यांनी पुन्हा एकदा त्याच रुग्णालायत दाख केले. यावेळस डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. यावेळी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन कैलाश यांचा महत्वाचा बॉडी पार्ट काढून टाकला. पुरुषांमध्ये असणारा हाइड्रोसील नावाचा पार्ट काढून टाकला. 


प्रकृती आणखी खालावली


शरीरातून  हाइड्रोसील काढून टाकल्याने कैलाश यांची प्रकृती आणखीणच खालावली यामुळे त्यांच्या पत्नीने दुसऱ्या रुग्णलयात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयाने त्यांना यासाठी परवानगी दिली नाही. कैलाश यांच्या शरीरातून हाइड्रोसील नावाचा पार्ट काढून टाकण्यात आल्याचे त्यांच्या पत्नीला समजले. यानंतर त्यांनी  रुग्णालयात गोंधळ घातला. तसेच पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली. यानंतर नर्सिंग होमचे संचालक आणि डॉक्टर सर्वजण फरार झाले आहेत.


आरोग्य विभागाने दिले चौकशीचे आदेश


या घटनेनंतर आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. फरार डॉक्टर तसेच या बोगस नर्सिंग होमवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. अशा प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सर्व नर्सिंगहोमची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 


बिहारमध्ये घडलेत अनेक धक्कादायक प्रकार


यापूर्वी देखील बिहारमध्ये असे अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत. . मुझफ्फरपूरच्या साक्रा भागातील एका बेकायदेशीर नर्सिंग होममध्ये एका  डॉक्टरने गर्भाशयाचे ऑपरेशन करताना किडनी काढली हो तर आणखी एका रुग्णालयात महिलेच्या गर्भाशयाचे ऑपरेशन करताना मुत्राशयाची नळी कापली होती. अशा प्रकारची अनेक बोगस रुग्णालये येथे आहेत.